महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार पार, गेल्या 24 तासात 547 नवे रुग्ण - News about corona virus

मुंबईत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजाराच्या पुढे गेली आहे. 24 तासात नवीन 547 रुग्ण आढळले आहेत.

number of corona victims in Mumbai has crossed 8,000
मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार पार, गेल्या 24 तासात 547 नवे रुग्ण

By

Published : May 2, 2020, 9:37 PM IST

मुंबई -दिवसेंदिवस मुंबईतील वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक आहे.कोरोना विषाणूचे आज नव्याने 547 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8172 वर पोहचला आहे. मुंबईत 27 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 322 वर पोहचला, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत कोरोनाचे नव्याने 547 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 357 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. 29 व 30 एप्रिलला खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 190 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 पैकी 20 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मुंबईत आतापर्यंत एकूण 322 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या विविध रुग्णालयातून गेल्या 24 तासात 137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 1704 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्यापैकी 145 रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. हे रुग्ण मुंबईमधील रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details