महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

2149 परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह परदेशी प्रवाशांची संख्या 10 वर - कोरोना पॉझिटिव्ह परदेशी प्रवासी संख्या मुंबई

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत 2 हजार 149 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी आतापर्यंत एकूण 11 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 4, 2021, 1:43 AM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत 2 हजार 149 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी आतापर्यंत एकूण 11 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या 11 पैकी 10 प्रवासी मुंबईतील तर, 1 प्रवासी मुंबईबाहेरील आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा -Central Railway : आठ महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १२३ कोटीची वसूली

परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांत कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच, त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर गेल्या 15 ते 20 दिवसांत जे प्रवासी परदेशातून आले आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून जे रुग्ण पाझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत.

मुंबईतील 10 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -

10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क देशातून 3 हजार 136 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 2 हजार 149 प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 11 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 11 पैकी 1 रुग्ण मुंबई बाहेरील तर, 10 रुग्ण मुंबईमधील आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग तसेच, एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

पॉझिटिव्ह प्रवासी -

1. लंडन येथून 10.11.2021 ला आलेला 21 वर्षीय पुरुष

2. मॉरीशियस येथून 25.11.2021 ला आलेला 47 वर्षीय पुरुष

3. साऊथ आफ्रिका येथून 25.11.2021 ला आलेला 39 वर्षीय पुरुष

4. लंडन येथून 1.12.2021 ला आलेला 25 वर्षीय पुरुष

5.लंडन येथून 17.11.2021 ला आलेला 66 वर्षीय पुरुष

6. पोर्तुगाल येथून 25.11.2021 ला आलेला 69 वर्षीय पुरुष

7. लंडन येथून 13.11.2021 ला आलेला 34 वर्षीय पुरुष

8. लंडन येथून 2.12.2021 ला आलेला 44 वर्षीय पुरुष

9. जर्मनी येथून 2.12.2021 ला आलेला 38 वर्षीय पुरुष

10. पॅरिस येथून 25.11.2021 ला आलेली 16 वर्षीय मुलगी

11. बार्सिलोना स्पेन येथून 28.11.2021 ला आलेला 41 वर्षीय पुरुष

हेही वाचा -Maharashtra Corona Update : शुक्रवारी राज्यात 664 नवे कोरोना रुग्ण; तर 915 रुग्णांना डिस्चार्ज

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details