महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मात्र दुपटीचा कालावधी झाला कमी - मुंबई कोरोना रुग्णसंख्या बातमी

मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

Mumbai corona patient news
Mumbai corona patient news

By

Published : Aug 26, 2021, 10:03 PM IST

मुंबई -कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ३००च्या खाली असलेली रुग्णसंख्या ४००च्या घरात गेली आहे. त्यातच रुग्ण दुपटीचा कालावधी २०५७वरून १८२५वर आला आहे. यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया

असा वाढतो आहे कोरोना-

मुंबईत १७ ऑगस्ट रोजी १९८ रुग्ण आढळून आले होते. तर २ जणांचा मृत्यू झाला होता. १८ ऑगस्टला २८३ रुग्ण आढळून आले होते, तर ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी रुग्ण दुपटीचा कालावधी २०५७ दिवसांवर पोहचला होता. काल २५ ऑगस्टला रुग्ण संख्येत वाढ होऊन ती ३४३वर पोहचली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८८४ दिवसांवर पोहचला होता. आज गुरुवारी २६ ऑगस्टला रुग्णसंख्येत वाढ होऊन ३९७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १८२५ दिवस इतका खाली घसरला आहे.

७ लाख ४२ हजार नागरिकांना कोरोना -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी ११ मार्च रोजी पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या दीड वर्षात ७ लाख ४२ हजार ४०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९६३ रुग्णांचा कोरोनामुळे झाला आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १८२५ दिवस इतका आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेल्या २४ इमारती सील करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तर पुन्हा लॉकडाऊन -

आपल्याकडे जिनोम सिक्वेनसींग मशीनमध्से आपल्याला १८८ पैकी १२८ नमुने हे डेल्टाचे सापडले आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. जे तज्ञ सांगत आहे, त्यानुसार एका दिवसाला आपल्याला अनेक रूग्ण सापडतील, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी केले आहे. तसेच रूग्ण संख्या वाढली, तर आपल्याला पुन्हा लॅाकडाऊन करावे लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं काळजी घेणं गरजेचं असल्याचेही त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांतली रुग्णसंख्या -

दिनांक रुग्णसंख्या
१७ ऑगस्ट १९८
१८ ऑगस्ट २८३
२० ऑगस्ट ३२२
२३ ऑगस्ट २२६
२४ ऑगस्ट २७०
२५ ऑगस्ट ३४३
२६ ऑगस्ट ३९७

रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला -

दिनांक दुपटीचा कालावधी
१८ ऑगस्ट २०५७
२१ ऑगस्ट २०२३
२३ ऑगस्ट १९८३
२४ ऑगस्ट १९५८
२५ ऑगस्ट १८८४
२६ ऑगस्ट १८२५

हेही वाचा -धक्कादायक: काबूल विमानतळाबाहेर दोन मोठे स्फोट

ABOUT THE AUTHOR

...view details