मुंबई-गेल्या २४ तासात कोरोनाचे १२,८४७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २.४७ टक्के पॉझिटिव्हटी दर आहे.देशात २४ तासात कोरोनामुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात ६३,०६३ कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची ( Daily Covid cases in India ) नोंद होत आहे.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत ( Maharashtra coronavirus cases ) पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी २२९३ रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन २३६६ रुग्णांची ( Maharashtra Coronavirus LIVE Updates ) नोंद झाली आहे. मंगळवारी २ मृत्यूची नोंद झाली होती. आज पुन्हा २ मृत्यूची नोंद झाली ( Covid death cases today in Maharashtra ) आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण ऑक्सिजनवर, १०४ रुग्ण आयसीयूमध्ये तर १० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात ( Daily Covid cases in India ) आली आहे.
अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार यांना झाला कोरोनाची लागण-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८१ वर्षीय फौसी यांनी कोरोना लसीचे दोन बूस्टर डोसही घेतले होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोविडची सौम्य लक्षणे आहेत. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे अलीकडच्या काळात फौसी हे, अध्यक्ष जो बिडेन किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ सरकारी अधिका-यांच्या संपर्कात आलेले नाहीत.