महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अवघ्या 20 दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एक हजाराने वाढला

मुंबईत सुरूवातीपासून कोरोना रुग्णांचे मृत्यू राखण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यानुसार ट्रेसिंग-टेस्ट-ट्रिटमेंट ही त्रिसूत्री अवलंबण्यात आली. तर त्यानंतर रेमडेसीवीर-टॉसिलीझुमाबसारखी इंजेक्शन उपलब्ध झाली. तसेच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल-मे-जूनपेक्षा जुलैमध्ये परिस्थिती सुधारल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पण मृत्यूदर अद्याप तोच आहे.

Thermal test
थर्मल चाचणी

By

Published : Aug 15, 2020, 6:28 PM IST

मुंबई - कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशाच्याच नव्हे तर महाराष्ट्रच्या मृत्युदरापेक्षाही एकट्या मुंबईचा मृत्युदर अधिक म्हणजेच 5.5 टक्के आहे. मात्र, त्यात थोडी दिलासा देणारी बाब अशी की, मुंबईतील मृतांचा आकडा एक हजाराने वाढण्यासाठीच्या दिवसात थोडी का होईना पण वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईतील मृतांचा आकडा 7 हजाराच्या वर गेला आहे. 6 हजारावरून 7 हजार वाचाआकडा होण्यासाठी अर्थात एक हजाराने मृताचा आकडा वाढण्यासाठी 20 दिवस लागले आहेत. याआधी 18 दिवस तर त्याआधी 12 दिवसाने एक हजार मृत्यू वाढले होते.

मुंबईत सुरूवातीपासून कोरोना रुग्णांचे मृत्यू राखण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यानुसार ट्रेसिंग-टेस्ट-ट्रिटमेंट ही त्रिसूत्री अवलंबण्यात आली. तर त्यानंतर रेमडेसीवीर-टॉसिलीझुमाबसारखी इंजेक्शन उपलब्ध झाली. तसेच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल-मे-जूनपेक्षा जुलैमध्ये परिस्थिती सुधारल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पण मृत्यूदर अद्याप तोच आहे.

हेही वाचा -74 वा स्वातंत्र्यदिन : कोरोना विषाणूमुक्तीचा लढा त्याग आणि लढवय्यांप्रमाणे जिंकणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शुक्रवारी मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा 7 हजारावर गेला. प्रथम मुंबईत मृतांचा आकडा एक हजार होण्यासाठी 70 दिवस लागले होते. म्हणजेच 17 मार्चला मुंबईत पहिला मृत्यू झाला होता आणि 25 मार्चला मृतांचा आकडा 1,026 झाला होता. त्यानंतर मात्र केवळ 18 दिवसात मृत्यू 2 हजारचा आकडा पार करून पुढे गेले. त्यानंतर केवळ 4 दिवसात एक हजार मृत्यू वाढून मृतांचा आकडा 3 हजार पार करून पुढे गेला.

त्यापुढे मृत्यूच्या आकड्यानी आणखी एक हजारचा टप्प्यात नऊ दिवसात पार केला. दरम्यान मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने सेव्ह लाईव्ह स्टटर्जी आणली. परिणामी 7 जुलैमध्ये मृत्यूचा आकडा 5 हजारावर गेला, पण यातील एक हजार मृत्यू होण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागला. पुढे हे दिवस वाढत चालले असून ही काही अंशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कारण मृतांचा आकडा 7 जुलैपासून एक हजारांनी वाढून तो 6 हजार होण्यासाठी 18 दिवस लागले. तर आता शुक्रवारी मृत्यूचा ऐकूण आकडा 7 हजार झाला असून 6 हजारावरून 7 हजार आकडा होण्यासाठी 20 दिवस लागल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून समोर येत आहे.

हेही वाचा -74वा स्वातंत्र्यदिन : संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर तिरंगी फुलांनी सजले

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही जुलैमध्ये मृत्यू कमी करण्यात पालिकेला काही अंशी यश आले आहे. पालिका-सरकारी रुग्णालयातील मृत्यू कमी होत आहेत. पण काही खासगी रुग्णालयात मृत्यू वाढत असल्याने मुंबईचा मृत्युदर वाढता आहे. यावर आम्ही लक्ष दिले नसून ऑगस्टमध्ये मृत्यूदर नक्कीच आणखी खाली येईल, असे स्पष्ट केले आहे.

त्याचवेळी 4, 9 आणि 12 दिवसात होणारे एक हजार मृत्यू आता 18 आणि 20 दिवसात होत आहेत. ही कोरोनाच्या संकट काळात दिलासा देणारी बाब आहे. तर आता महापालिकेने मृत्यू दर नियंत्रणात आणत अर्थात तो 2-3 टक्क्यांवर आणत आणखी दिलासा द्यावा, हीच अपेक्षा मुंबईकरांची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details