मुंबई -राज्यात सद्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यत आहे. अशात आता प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे -सध्या आमच्यासोबत 6-7 अपक्ष आमदारांसह 46 आमदार आहेत. हा आकडा येणाऱ्या काळात वाढेल. आत्तापर्यंत आम्हाला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
फोटोत मात्र 34 आमदार -एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होण्यासाठी त्यांना 37 शिवसेना आमदारांची गरज आहे. सूरतमधून माध्यमांना मिळालेल्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यातील 32 आमदार शिवसेनेचे आहेत. त्याचे इतरही काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये राज्यातील 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे एकूण 32 आमदार आहेत. तर इतर पक्षांचे 2 आमदार आहेत. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेचे 32 आमदार शिंदे यांच्याबरोबर असल्याचे दिसते, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.