मुंबईअभिनेता रणवीर सिंग ( Actor Ranveer Singh ) याने इंस्टाग्राम अकाउंटवर ( Instagram account ) त्याचे नग्न फोटो पोस्ट केल्याबद्दल ( Ranveer Singh nude photos on Instagram account ) चेंबूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात मुंबई पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रणवीर सिंगच्या घरी त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यासाठी गेले होते. मात्र अभिनेता त्याच्या निवासस्थानी नव्हता. पोलिसांना तो १ ऑगस्ट रोजी परत येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा समन्स बजावण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जातील.
एफआयआर दाखलचेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी ( Lalit Tekchandani ) यांनी एफआयआर दाखल केला : चेंबूरमध्ये रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळल्यास रणवीर सिंगला अटक होऊ शकते. न्यूड फोटोशूट ( Nude photo shoot ) करून रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.