महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2022, 10:20 AM IST

ETV Bharat / city

CBI Arrests Anand Subramanian : 'NSE'चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना 'CBI'कडून अटक

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी, माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना सीबीआयने (CBI) रात्री उशिरा चेन्नईतून अटक केली आहे. आनंद सुब्रमण्यम यांच्यावर NSE च्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.

National Stock Exchange of India Limited (NSE)
National Stock Exchange of India Limited (NSE)

मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी एमडी, माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम (Anand Subramaniam) यांना सीबीआयने (CBI) रात्री उशिरा चेन्नईतून अटक केली आहे. आनंद सुब्रमण्यम यांच्यावर NSE च्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. (NSE fraud case CBI arrests Anand Subramaniam) ते एनएसईच्या माजी सीईओला सल्ला द्यायचे आणि त्या त्याच्या इशाऱ्यावर काम करायची. चित्रा रामकृष्ण हिमालयात राहणार्‍या एका योगीकडून तिच्या कामात मदत घ्यायच्या, अशा चर्चा होत्या. नंतर असे वृत्त आले की योगी दुसरे कोणी नसून आनंद सुब्रमण्यम आहेत.

ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम आणि माजी CEO यांना देखील नियुक्त केले

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान चित्राने स्वत:ला पीडित असल्याचा दावा करत तिला अनेक गोष्टींची माहिती नसल्याचे सांगितले. ती वेळोवेळी तिच्या वक्तव्यात बदलही करत, तपासाची दिशा बदलण्याचाही प्रयत् तिने केला. चित्राने तिच्या निर्दोष असल्याचा दावा केला आहे आणि म्हटले आहे की कोणीतरी तिला फसवत आहे. चित्रा व्यतिरिक्त, CBI ने 'योगी' च्या सूचनेनुसार NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम आणि माजी CEO यांना देखील नियुक्त केले आहे. रवी नारायण यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर देखील जारी करण्यात आले आहे.

192 पानांचा अहवाल

खबरदारीचा उपाय म्हणून आनंद सुब्रमण्यम यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. चित्रा रामकृष्ण आणि त्यांच्या आधी एनएसईचे सीईओ असलेले रवी नारायण आणि आनंद यांनी देश सोडल्याच्या संशयावरून हे पाऊल उचलण्यात आले. आता या प्रकरणात अटकेची भीती वाढली आहे. सेबीच्या 192 पानांच्या अहवालाच्या आधारे सीबीआयने चित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चित्रा यांनी हिमालयातील एका योगीसोबत एनएसईची गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप सेबीने अहवालात केला होता.

सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली

सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.

इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.

ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले

सेबीने (SEBI) दिलेल्या माहितीनुसार चित्रा या हिमालयातील एका योगी बाबांच्या सल्ल्यानुसार सर्व निर्णय घेत होत्या. या बाबांच्या सल्लानंतरच त्यांनी आनंद सुब्रहमण्यम यांना एक्सचेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. सेबीने चित्रा रामकृष्ण आणि यात सामिल इतर काही व्यक्तीबाबत शुक्रवारी एक आदेश काढत ही माहिती दिली. सेबीकडून या सर्वांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा -शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

ABOUT THE AUTHOR

...view details