महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शाळाप्रवेश वय शिथिलतेचे अधिकार आता मुख्याध्यापकांना - first standard

पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयात १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे.

सर्व शिक्षा अभियान

By

Published : Jul 26, 2019, 10:54 AM IST

मुंबई- वर्षानुवर्षे शाळाप्रवेश वयाचा गोंधळ सरकारला मिटवता येत नसून सरकारने आता शाळा प्रवेशाच्या किमान वयात १५ दिवस शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना दिले आहेत. यापूर्वी शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी ३१ जुलै ऐवजी ३० सप्टेंबर हा दिनांक गृहीत धरण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या राजपत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ जून २०१० रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही बालकास मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. मात्र, प्रचलित तरतुदीनुसार यापुढेही ५ वर्ष पूर्ण केलेल्या बालकास इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देता येईल व असे बालक मोफत व सक्तीच्या शिक्षणास पात्र राहतील.

अंगणवाडी, बालवाडी, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षांहून अधिक व पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असावीत अशी वयांची अट अंमलबजावणीसाठी जारी करण्यात आली. यापुढे प्रवेश देताना, सर्व शाळांनी ३० सप्टेंबर हा मानीव दिनांक गृहीत धरून मुलांचे वय निश्चित करावयाचे आहे. प्रवेशाच्या किमान वयात १५ दिवस म्हणजे 15 आक्टोबर पर्यंतची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details