मुंबई -शिवसेनेचे आक्रमक नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भावनिक आवाहन केले. मात्र त्यानंतरही 7 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणे पसंद केले आहे. त्यामुळे 55 आमदारापैकी आता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी फक्त 13 आमदारांचे संख्याबळ उरले आहे.
काय आहे एकनाथ शिंदे शिवसेना वाद -विधानपरिषदेची निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्याने शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात नाराजी होती. मात्र, आमदार फुटल्याचे खापर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर फोडण्यात आले. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी डझनभर आमदारांना सोबत घेत सूरत गाठले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यानंतर शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
शिवसेनेचे किती आमदार फुटले -एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत अगोदर 12 ते 15 आमदार फोडल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 34 आमदार असल्याचे उघड झाले. अगोदर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित असलेले आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. फुटलेल्या आमदारांमध्ये, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संदिपान भुमरे, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, सिताराम मोरे, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, लहुजी बापू पाटील, महेंद्र दळवी, प्रदीप जैस्वाल, महेंद्र थोरवे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले, बालाजी किणेकर, उदयसिंह राजपूत, राजकुमार पटेल, लता सोनवणे, नितीन देशमुख, संजय गायकवाड, नरेंद्र मांडेकर या आमदारांचा सहभाग होता. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री शिवसेनेचे आणखी 7 आमदार नॉट रिचेबल असल्याचे उघड झाले. यातील दादरचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ला मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर हे गुवाहाटीत सकाळीच दाखल झाले. तर दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप मामा लांडे हे अद्याप नॉट रिचेबल असून ते लवकरच गुवाहाटीत पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेसोबत उरले फक्त इतके आमदार -एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. आमदारांसोबत खासदारही फुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. सध्या शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारेच आमदार उरले आहेत. या आमदारांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या आमदारांची यादी खालीलप्रमाण
1) अजय चौधरी - शिवडी
2) रमेश कोरगावकर भांडूप प
3) सुनिल राऊत विक्रोळी - राऊत
4) रविंद्र वायकर - जोगेश्वरी