मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे कोणाला मिळणार ? अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा वाद सर्वोच्च न्यायालयात होता. घटनापिठाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग केले आहे. त्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह व शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे. Sandeep Deshpande On Uddhav Thackeray या वादात आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे MNS leaders Sandeep Deshpande यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
भोळा चेहरा करून खोटं बोलणंयावेळी बोलताना देशपांडे म्हणाले की, या आधीच मी बोललो होतो खोटं बोललं, की देव कान कापतो आणि तेच आता झालेलं दिसतंय. ठाकरे कुटुंबात असा एकही व्यक्ती मी पाहिलेला नाही, जो आपला भोळा साधा चेहरा घेऊन जनतेत जातो आणि रेटून खोटे बोलतो. Sandeep Deshpande On Uddhav Thackeray तसं उद्धव ठाकरे करतात. उद्धव ठाकरे आपल्या साध्या भोळ्या चेहऱ्याआडून नेहमीच खोटे बोलत आलेले आहेत. आणि आता त्याचे शिक्षा त्यांना मिळालेली दिसते, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.