महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vande Mataram आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचे आवाहन, शासनाने काढले परिपत्रक

लोकप्रतिनिधी अथवा सामान्य लोकांनी आता शासकीय कामानिमित्त वन विभागात संपर्क केल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणत संभाषणाची सुरूवात करावी, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. Vande Mataram तसेच हॅलो ऐवजी वंदे मातरम् शब्दाचा ऐच्छिक वापर करण्याचे आवाहन वन विभागाला करण्यात आले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Aug 25, 2022, 10:41 PM IST

सातारा - लोकप्रतिनिधी अथवा सामान्य लोकांनी आता शासकीय कामानिमित्त वन विभागात संपर्क केल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणत संभाषणाची सुरूवात करावी, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. hello,तसेच हॅलो ऐवजी वंदे मातरम् शब्दाचा ऐच्छिक वापर करण्याचे आवाहन वन विभागाला करण्यात आले आहे.

शासनाचे परिपत्रक

पोलीस म्हणतात जय हिंद कोणत्याही पोलीस ठाण्यातील दूरध्वनीवर अथवा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क केल्यास ते संभाषणाची सुरूवात जय हिंद म्हणून करतात. सर्वसामान्यांना ते परिचित झाले आहे. त्याच धर्तीवर वन विभागाच्या कार्यालयातील दूरध्वनीवर, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर लोकप्रतिनिधी अथवा सामान्य नागरिकांनी संपर्क केल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम् संभाषणाची सुरूवात होणार आहे.

छगन भुजबळ म्हणतात, बंधन घालणं योग्य नाहीमंत्री झाल्यावर आदेश काढण्यात आला. या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण जय हिंद म्हणतात, पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात. शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर तेही जय महाराष्ट्र म्हणतात. आता शिंदेंनी सुधीर मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचं भान ठेवायला हवे. मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन. कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात, असे छगन भुजबळांनी यापुर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अभिमान वाटणाऱ्या बाबींना हरकत नसावी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध तर पंकजा मुंडे यांनी समर्थन केले होते. अमित शहा तसेच भाजपच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी वंदे मातरम् बोलतात. ते ऐकायलाही छान वाटते. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा -Thackeray vs Thackeray ठाकरे विरुद्ध ठाकरे! गणपतीनंतर पुढची लढाई रस्त्यावर, वाचा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details