महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अयोध्या निकाल, राज्याला सतर्क राहण्याच्या केंद्राकडून सूचना - Alert alert from Central Government

आयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल दिला जाणार आहे. यामुळे राज्यात सरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील संवेदनशील परिसरामध्ये सुरक्षा बल तैनात करण्यात यावे अशा सूचना केंद्र सरकार कडून देण्यात आल्या आहेत.

राज्याला सतर्क राहण्याचे केंद्राकडून सूचना

By

Published : Nov 8, 2019, 8:18 AM IST

मुंबई -अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल दिला जाणार आहे. त्याला अनुसरून राज्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. अयोध्या प्रकरणी राज्यातील संवेदनशील परिसरांमध्ये अधिक सुरक्षा बल तैनात करण्यात यावे, अशी सूचना केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आलेली आहे. अयोध्या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहावे असे केंद्राने म्हटले आहे .

राज्याला सतर्क राहण्याचे केंद्राकडून सूचना

मुंबईसारख्या शहरात सुद्धा संवेदनशील परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्याच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती करून दिली. याबरोबरच मुंबई शहरातील वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचं काम मुंबई पोलिसांकडून केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details