मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( ED Notice to Eknath Khadse ) यांना ईडीने झटका दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि इतर 4 आरोपींच्या जवळपास 11 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मालमत्ता संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती मिळत आहे.
10 दिवसात मालमत्ता खाली करण्याची सूचना - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. नोटीस दिलेल्या 10 दिवसापर्यंत ही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई अश्या ठिकाणी या मालमत्ता होत्या. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि इतर आरोपींच्या नावावर या मालमत्ता होत्या.