मुंबई - जगभरात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या मशीनमध्ये कधीही आणि कुठेही छेडछाड करता येऊ शकते, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सर्व ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची १०० टक्के मोजणी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.
व्हीव्हीपॅटची ५० नव्हे १०० टक्के मोजणी करावी, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
आव्हाड यांनी देशातील सर्व विरोधीपक्ष, संघटनांनी एकत्र येऊन आयोगाकडे ५० टक्के नव्हे तर १०० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी केली जावी, यासाठी आग्रह धरावा आणि देशभरात ही मागणी लावून धरावी, असे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासून देशातील सर्व विरोधीपक्ष आणि संघटनांनी ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी, अशी मागणी लावून धरली आहे. कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून त्यासाठीची मागणी केली. तर त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आयोगाला एक पत्र लिहून आयोगाकडे व्हीव्हीपॅटची ५० टक्के मोजणी करावी अशी मागणी केली. त्याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी देशातील सर्व विरोधीपक्ष, संघटनांनी एकत्र येऊन आयोगाकडे ५० टक्के नव्हे तर १०० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी केली जावी, यासाठी आग्रह धरावा आणि देशभरात ही मागणी लावून धरावी, असे आवाहन केले आहे.
आम्ही कोणाला मत दिले हे आम्हाला कळले पाहिजे, यासाठी देशातील २१ विरोधी राजकीय पक्षांनी आता का गप्प राहून चालणार नाही त्यांनी समोर येऊन देशभरातील लोकसभा मतदानाच्या दरम्यान झालेल्या मतमोजणीत व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचा आग्रह धरवा, असे आवाहन केले आहे.