मुंबई -देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार असले तरी या सरकारने महागाई विकोपाला नेली आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. तसेच, प्रादेशिक पक्षांना चिरडण्याचा या सरकारचा डाव आहे. तसेच, देशात धार्मिक हल्ले आणि दंगली होत असून पंतप्रधान त्याबाबत काहीही बोलत नाहीत, यासंदर्भात त्यांना विरोधकांनी पत्रही दिले आहे. ( NCP Chief Sharad Pawar ) या सर्व पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा राज्यांमधील अकरा मुख्यमंत्री आणि भाजपा विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात लवकरच एक बैठक मुंबईत आयोजित केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करतील असही राऊत यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारणार यजमानपद -विरोधकांची मोट बांधणे आणि केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला शह देणे हा मुख्य उद्देश आहे. हे सरकार धार्मिक तेढ निर्माण करून मूळ मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा या सरकारचा डाव आहे म्हणून या सरकार विरोधात उद्धव ठाकरे नेहमीच आक्रमक राहिले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार विरोधकांची ही बैठक लवकरच मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.