महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Opposition Unity for 2024 Elections : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी गैर भाजपशासित राज्यांची मोट बांधणी? - Mamta Banerjee Latest News

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला ( BJP Won Election In Five State ) मिळालेल्या यशामुळे 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha Election ) भारतीय जनता पक्षाचे मनोबल चांगलेच वाढले आहे. मात्र, या विजयानंतर विरोधी पक्षाचा गोटात शांतता पसरली असली तरी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगर भाजपशासित राज्यांमध्ये हालचाली ( Non BJP CM Come Togather Against Narendra Modi ) सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

2024 Loksabha Election
2024 Loksabha Election

By

Published : Mar 27, 2022, 9:39 PM IST

मुंबई -पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला ( BJP Won Election In Five State ) मिळालेल्या यशामुळे 2024ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha Election ) भारतीय जनता पक्षाचे मनोबल चांगलेच वाढले आहे. खासकरून उत्तर प्रदेशामध्ये मिळालेली एक हाती सत्ता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. मात्र, या विजयानंतर विरोधी पक्षाचा गोटात शांतता पसरली असली तरी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगर भाजपशासित राज्यांमध्ये हालचाली ( Non BJP CM Come Togather Against Narendra Modi ) सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बिगर भाजपशासित राज्य एकत्र येणार? -पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, केवळ तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. याचा धसका काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दिल्लीतील शीर्ष नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. तसेच पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षकडून राजीनामे घेण्यात आले. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस पर्याय उभा करू शकेल का? असा सवाल आता विचारला जातो आहे. त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगर भाजपशासित राज्य एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री यांची एक बैठक लवकरच तेलंगणा किंवा दिल्ली येथे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व बिगरशासित मुख्यमंत्र्यांची बोट बांधण्याचे काम राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर यांनी सुरुवात केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री घेणार पुढाकार -2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या विरोधात सक्षम पर्याय उभारावा, यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुढाकार घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री एम के स्टालीन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही बैठक दिल्ली किंवा तेलंगणाला होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली होती. त्यावेळेसही लवकरच बैठक घेण्यात येईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली होती.

प्रशांत किशोर यांच्याकडून प्रयत्न -तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, उडीसा या दहा राज्यांमध्ये जवळपास अडीशे लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी अडीचशे जागांवर दहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन रणनीती आखल्यास त्याचा मोठा फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना बसू शकतो. याबाबतची रणनीती तसेच राजकीय समीकरणे जोडण्याचा प्रयत्न राजकीय विशेषज्ञ प्रशांत किशोर यांच्याकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र या दहा राज्यांची राजकीय समीकरण योग्यरीत्या बसने हे देखील एक आव्हान असणार आहे.

काँग्रेसची भूमिका महत्त्वाची - 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या विरोधात दहा राज्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, काँग्रेसला डावलून लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवणं कठीण असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं आहे. कारण बिगर भाजपशासित राज्य एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास काही ठिकाणी थेट काँग्रेसला आव्हान द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षाला होणार आहे. तर महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून पाठिंबा मिळवत राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला डावलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट तिसऱ्या आघाडीत जाऊन बसतील का? तसेच भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून हे सर्व राज्य एकत्र येऊ शकतील का? किंवा काँग्रेस याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे? असा सवाल देखील विजय काकांकडून उपस्थित केला जातो आहे.

काँग्रेसप्रणीत यूपीए भक्कम -2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित युपीए हेच एक भक्कम पर्याय असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सार्वजनिक संपत्ती विकायला काढली. महागाईमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जे विरोधात आहेत, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यूपी सोबतच येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -Nana Patole on Bjp : भाजप मागील 7 वर्षांपासून समाजात विष पेरण्याचं काम करतंय - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details