मुंबई -राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील देशातून मदतीचा ओघ वाढला आहे. या मदतीच्या वाटपासाठी महाराष्ट्रात उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केल्याची माहिती राज्य शासनाने दिली. राज्य शासन, अधिकृत व वैधानिक संस्थाकडूनही मदत देण्यात असल्याचे शासनाने म्हटले आहे.
देशाबाहेरील दानशुरांकडून मदतीचा ओघ, वाटपासाठी महाराष्ट्रात ‘नोडल अधिकारी’
देशाबाहेरील दानशुरांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. या सर्व मदतीचे नियोजन आणि वाटप करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमणामुळे देशातून आणि देशाबाहेरील नागरिकांकडून मदत मिळत आहे. दानशूर व्यक्तींसाठी ‘कोविड-19 रिलिफ आयटम’ मोहीम सुरु केली आहे. परदेशातून येणाऱ्या साहित्यावर 'आयजीएसटी'ची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे. प्रशासकीय पुढाकाराचा परिणाम यावर व्हावा, तसेच त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अधिक माहिती आणि मदतीसाठी संबंधित विभागाचा संपर्क क्रमांक - (022) 22028616/22023584जाहीर केला आहे. मात्र, दानशूरांना अटी शर्तीच्या धर्तीवर नोडल अधिकारी सवलत प्रमाणपत्र देतील. यात संस्थेने नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे, चलन/खरेदी बील, पॅकींग लिस्ट, कार्गो तपशील, देणगीदाराचे घोषणापत्र करणे बंधनकारक आहे. संबंधितांनी सर्व तपशीलांसह आपला अर्जdidci@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावा, असे आवाहन केले आहे.
अशा आहेत अटी -
- वस्तू विनामूल्य आयात करुन भारतात कोठेही विनामूल्य वितरण केले जाऊ शकते.
- आयातदाराने सीमाशुल्कांकडून वस्तू मंजूर होण्यापूर्वी त्या नोडल ऑथॉरिटीकडून माल कोविड रिलिफसाठी विनामूल्य वितरणासाठी प्रमाणपत्र सादर करणे.
- आयातदार महाराष्ट्र राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयात करण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत आयात केलेल्या वस्तूंचे तपशील व त्या विनामूल्य वितरित केल्याबाबत समर्थनीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह एका स्टेटमेंटमध्ये सादर करावा, जेणेकरुन ते प्रमाणित करुन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.
- कागदपत्रांची व अटींची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी असल्यास उद्योग उपसंचालक अजयकुमार पाटील, यांच्याशी9930410922या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन उद्योग संचालनालयाने केले आहे.