महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'ईटीव्ही भारत'चा रियालिटी चेक - मुंबईत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध - मुंबई लेटेस्ट न्यूज

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्याबरोबरच देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजन साठ्याबाबत केलेल्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली होती. सध्यस्थितीला मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

मुंबईत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध
मुंबईत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध

By

Published : May 7, 2021, 10:56 PM IST

मुंबई -राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्याबरोबरच देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजन साठ्याबाबत केलेल्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली होती. सध्यस्थितीला मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. मुंबईत किती ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे याबाबतचा ई टीव्ही भारतने केलेला रियालिटी चेक

मुलुंड कोविड सेंटर

मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 1650 बेड आहेत. त्यातील 100 पेक्षा जास्त बेड हे रिकामे आहेत. तसेच 700 ऑक्सिजन बेड आहेत. त्याबरोबर ऑक्सिजन साठाही उपलब्ध आहे. कोणताही तुटवडा सध्या जाणवत नाही. पालिकेने योग्यप्रकारे नियोजन केले आहे असे मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरचे डॉक्टर अभय नाईक यांनी सांगितले.

बीकेसी कोविड सेंटर

बीकेसी कोविड सेंटर टप्पा 1 मध्ये दिवसाला 7.14 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. तर 14.81 मेट्रिक टनची टाकी आहे. दिवसाला 7.14 मेट्रिक टनचा वापर होत असताना दररोज 5.38 मेट्रिक टन ऑक्सिजन पालिकेकडून उपलब्ध होते. त्यामुळे टाकीत 11.97 मेट्रिक टन ऑक्सिजन शिल्लक राहतो. त्याचवेळी टप्पा 2 मध्ये ही 14.81 मेट्रिक टनचा टॅंक असून, या टाक्या नेहमी भरलेल्या असतात, अशी माहिती डॉ राजेश डेरे, अधिष्ठाता बीकेसी कोविड सेंटर यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांची पत्रकार परिषद

गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटर

गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटरमध्ये सद्या रुग्ण संख्या काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे आजचा विचार करता येथे दिवसाला 13.5 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. सेंटरमध्ये 13 हजार किलो लिटरच्या दोन मोठ्या टाक्या असल्याने यात चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजन असतो. त्यामुळे येथे ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवत नाही. तर सेंटरमध्ये 1200 सिलेंडरचा शिल्लक साठा ही असल्याची माहिती डॉ नीलम अंद्रादे यांनी दिली आहे.

हेही वाचा -रेमडेसिवीरचा १६ मे रोजीपर्यंत देशात पुरेसा पुरवठा करणार- सदानंद गौडा

ABOUT THE AUTHOR

...view details