महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ड्रीम्स मॉलमधील ‘सनराईज’ला यापुढे रुग्णालयासाठी नसेल परवानगी - सनराईज हॉस्पिटल आग

कोरोना काळामुळे ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालय कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपल्याने ३१ मार्चपर्यंत वाढीव मुदतीची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ३१ मार्च रोजी ही मुदत संपली. मात्र दुर्दैवाने २६ मार्च रोजी दुर्घटना घडल्याने ११ जणांचा बळी गेल्याने सद्यस्थितीत मॉलसह हे रुग्णालय बंद आहे. त्यामुळे आगामी काळात या मॉलमध्ये रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे काकाणी यांनी सांगितले.

sunrise hospital, fire incident mumbai, मुंबई आग, मुंबई लेटेस्ट न्यूज
आग

By

Published : Apr 1, 2021, 2:28 PM IST

मुंबई - भांडुप ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला तत्कालीन आणि सध्याचे पालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समितीत करत निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘सनराईज’ हॉस्पिटलला रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

न्यायधीशांमार्फत चौकशीची मागणी -

भांडूप येथील ड्रीम्स मॉलला २६ मार्चला आग लागली. ही आग विझवण्यासाठी २३ तासांचा कालावधी लागला होता. या आगीत मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड परिस्थितीचे कारण देत एका दिवसात तत्कालीन पालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी परवानगी आणि ओसी दिली होती. त्यासाठी पालिका आयुक्तांनी एक व्हाट्सएप ग्रुप बनवून अधिकाऱ्यांना सर्व नियम बाजूला ठेवून ओसी देण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी इमारत प्रस्ताव विभागाने ओसी देऊ नये, असे मत नोंदवले होते. परदेशी यांची बदली होऊन इकबाल सिंग चहल यांची नियुक्ती झाल्यावरही इमारत प्रस्ताव विभागाने ओसी रद्द करण्यास सांगितले होते. आजी माजी दोन्ही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची तसेच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली.

रुग्णालयाच्या परवानगीची मुदत संपली -

कोरोना काळामुळे ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालय कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ही मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपल्याने ३१ मार्चपर्यंत वाढीव मुदतीची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ३१ मार्च रोजी ही मुदत संपली. मात्र दुर्दैवाने २६ मार्च रोजी दुर्घटना घडल्याने ११ जणांचा बळी गेल्याने सद्यस्थितीत मॉलसह हे रुग्णालय बंद आहे. त्यामुळे आगामी काळात या मॉलमध्ये रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा -भांडुप सनराईज हॉस्पिटल आगीची चौकशी, १५ दिवसात अहवाल

ABOUT THE AUTHOR

...view details