महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये : मुख्यमंत्री

मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत. कोणीही उपचारापासून वंचित राहू नये. तसेच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 30, 2020, 4:07 PM IST

मुंबई - एकाबाजूला राज्यपालांकडे प्रलंबित असलेली आमदारकीची नेमणूक आणि विरोधकांचे होणारे आरोप. हे सर्व बाजुला सारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची तपासणी करावीत. त्यांना चांगले उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचाराविना रुग्णालयातून परत पाठवण्यात येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा...हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला - अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली. 'अन्य कोणतेही आजार नसलेल्या आणि कोविड-19 लक्षणे नसलेल्या तरिही कोविड-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर म्हणजेच सीसीसीमध्ये पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा सल्ला द्यावा, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत. कोणीही उपचारापासून वंचित राहू नये. तसेच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.

मुंबई शहरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावे. जेणे करून रुग्णवाहिकांच्या वाहतुकीत सुसूत्रता येईल. रुग्ण कोणताही असला, तरी तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्णांची तपासणी केली जावी. मात्र, कुठल्याही परिस्थितीत एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना परत जाता कामा नये. याची दखल घेतली पाहिजे, असे सदर आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा...कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई पोलीस खात्यात विशेष बदल

रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र पाठवणे, त्या ठिकाणी दाखल करून घेणे, घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असेही निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. मुंबई असलेल्या रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिला जावा. त्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जाऊ नये, असेही निर्देश अधिसूचनेत आहेत.

कोविड-19 संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन दाखल करून घ्यावे. त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल, अशी व्यवस्था करावी आणि रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे पाठवण्यात यावे.

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत मृतदेह वॉर्डमधून बाहेर काढण्याबाबत कार्यवाही करायची आहे. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करायची, जी कार्यपद्धत ठरवून दिलेली आहे, त्यानुसारच १२ तासाच्या आत ते पूर्ण करायचे आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details