महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आलेले नाही अजित पवार - आमदार

सध्या एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या पाठीमागे 145 पेक्षा अधिक MLA आमदारांचे पाठबळ आहे. सरकार स्थापन करायला हा आकडा महत्त्वाचा आहे. मात्र ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या मागे 145 आमदारांचा पाठबळ राहणार नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे सरकार Shinde Government कोसळेल असे मत अजित पवार Ajit Pawar यांनी व्यक्त केले. तसेच हे सांगत असतांनाच आज एकनाथ शिंदे यांच्या मागे 145 आमदारांचे पाठबळ असले तरी सत्तेचा ताम्रपट घेऊन the brass plate of power कोणीही जन्माला आलेले No one is born नाही. असा इशाराही पवार यांनी दिला. प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Aug 15, 2022, 5:20 PM IST

मुंबई राज्यामध्ये आता बहुमताने एकनाथ शिंदे सरकार आहे. हे सरकार आणण्यासाठी कोणी गद्दारी केली याबाबत आपण काहीही बोलणार नाही. मात्र सध्या एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या पाठीमागे 145 पेक्षा अधिक आमदारांचे MLA पाठबळ आहे. सरकार स्थापन करायला हा आकडा महत्त्वाचा आहे. मात्र ज्या वेळेस एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या मागे 145 आमदारांचा पाठबळ राहणार नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे सरकार Shinde Government कोसळेल असे मत अजित पवार Ajit Pawar यांनी व्यक्त केले. तसेच हे सांगत असतांनाच आज एकनाथ शिंदे यांच्या मागे 145 आमदारांचे पाठबळ असले तरी सत्तेचा ताम्रपट घेऊन the brass plate of power कोणीही जन्माला आलेले No one is born नाही. असा इशाराही पवार यांनी दिला. प्रदेश कार्यालयात ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना अजित पवार बोलत होते.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना अजित पवार


राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असतांना हे सरकार पंचवीस वर्षे टिकेल. अशी वक्तव्य महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केली जात होती. मात्र असे हे बोलायला केवळ सोप्प आहे. याने फक्त कार्यकर्ते खुश होतात. त्यामुळे आता सत्तेत आलेले एकनाथ शिंदे देखील आमचे सरकार वीस वर्ष टिकेल अशा वल्गना करीत आहे. जोपर्यंत बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे यांच्या मागे आहे. तोपर्यंत हे सरकार टिकेल असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. तसेच सत्तेत आलेल्या सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणूक राज्यामध्ये 48 पैकी 47 खासदार निवडून आणणार असल्याचा दावा केलाय. मात्र अजित पवार यांनी यावर चिमटा काढत 47 पेक्षा सर्व 48 खासदार निवडून दाखवा असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला एवढे खासदार निवडून आणता आले नाही हे देखील स्पष्ट केले.




हलक आणि वजनदार असे कोणतेही खाते नसतेएकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खाते वाटप होत नसल्याने सरकारवर टीका होत होती. मात्र एकनाथ शिंदे सरकारने 13 ऑगस्ट रोजी खाते वाटप केले. हे खातेवाटप करतांना आनंद एकनाथ शिंदे गटाला हलकी खाती दिली गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तुलनेने वजनदार असलेली खाती भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे ठेवली असून हलकी खाती एकनाथ शिंदे गटाला देण्यात आली असल्याचे म्हणटले जाते. मात्र यावर बोलताना विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की हलक आणि वजनदार असे कोणतेही खाते नसते. प्रत्येक खात्याचे आपले महत्त्व आहे. 1999 साली मीच कृष्णा खोरे खात्याचे मंत्रिपद स्वीकारले होते. यात केवळ सहा ते सात जिल्ह्यापुरते काम करावे लागणारे हे मंत्रीपद होते. ते आपण स्वीकारून काम केले असल्याची आठवणही अजित पवारांनी यावेळी करून दिली. ज्या खात्यांना वजनदार खाते म्हटले जाते. असे खाते एखाद्या कर्तुत्व शून्य आमदाराला मिळाले तर त्या खात्याला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला मिळेल त्या खात्यामध्ये चांगले काम केले पाहिजे. तसेच मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. असा सल्लाही अजित पवार यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिला आहे. काही खाते ही ग्रामीण भागांमध्ये काम करण्यासाठी असतात. तर काही खाती ही शहरी नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी असतात. आरोग्य खाते आणि गृह खात्याचा संबंध राज्यातील संपूर्ण जनतेशी येतो.


मंत्रिमंडळ विस्तारात नाराजी काढण्याचा प्रयत्नसध्या दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात जास्तीत जास्त 43 ते 45 मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे अजूनही 20 ते 21 मंत्रीपदे शिल्लक आहे. यामध्ये किती केंद्रीय मंत्री आणि किती राज्यमंत्री बनवायची हा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. मात्र तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सरकार पक्षातर्फे असलेल्या गटांमध्ये कोणी नाराज असेल तर त्यांना संधी मिळू शकते. असे मतही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचाIndian Independence Day जगाच्या कामाकोपऱ्यात होतोय स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details