मुंबई यंदा 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत त्यापार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आता महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंधेला मोठी घोषणा केली आहे यापुढे सरकारी कार्यालयामध्ये अथवा सरकारी कर्मचाऱ्यांना फोनद्वारे संवाद साधताना हॅलो नाहीतर वंदे मातरमने संभाषणाला सुरुवात करावी लागणार govt employees to start teleconversation with Vande Mataram आहे. लवकरच त्याबाबत आदेश काढण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केली आहे
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे. हा केवळ एक शब्द नसून भारत मातेबद्दलच्या भारतीयांच्या भावनांचे प्रतीक आहे 1875 मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या या गाण्याने त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांना ऊर्जा दिली. हे आई मी तुला नमन करतो ही भावना व्यक्त करून बंकीमचंद्रांनी अनेकांच्या हृदयात देशभक्तीची ठिणगी पेटवली असेही मुनगंटीवार यांनी सांगितलं