मुंबई-पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 15 हजार 423 कोटी 39 लाख 67 हजार रुपयांचा चुना लावून भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्यावर भारतीय तपास यंत्रणेकडून कारवाई केली जात आहे. लंडन येथील कारागृहात असलेल्या नीरव मोदीला भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्याचा निर्णय येथील स्थानिक न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यार्पण करून लवकरच त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल 7 हजार 409 कोटी 7 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आलेले होे. याबरोबरच नीरव मोदीचा नातेवाईक मेहुल चोक्सी याला तब्बल 8 हजार 14 कोटी 32 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज पंजाब नॅशनल बँकेकडून देण्यात आले आहे. या दोघांनी आर्थिक घोटाळा केल्यानंतर भारताबाहेर पलायन केले. पंजाब नॅशनल बँकेला या दोघांकडून आतापर्यंत एक रुपयाही वसूल करता आलेला नाही.
पंजाब नॅशनल बँकेला 15 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदी व मेहुल चोक्सीच्या संदर्भात फेब्रुवारी 2018 मध्ये आर्थिक घोटाळा समोर आलेला होता. अडीच वर्षे होऊन गेल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेला या दोघांकडून एक रुपयासुद्धा वसूल करता आलेला नाही. नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या विरोधात बँकेकडून खटला दाखल करण्यात आलेला आहे.
पीएनबी बँक घोटाळा: नीरव मोदीकडून एकही रुपयाही वसूल नाही! - PNB fraud case news
नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल 7 हजार 409 कोटी 7 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आलेले होे. याबरोबरच नीरव मोदीचा नातेवाईक मेहुल चोक्सी याला तब्बल 8 हजार 14 कोटी 32 लाख 41 हजार रुपयांचे कर्ज पंजाब नॅशनल बँकेकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा-सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास ८० लाख कोटी रुपये धोक्यात
नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याविरोधात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून कारवाई करण्यात आला. ईडीकडून नीरव मोदी यांची बहीण व तिचा पती यांनी विशेष न्यायालयामध्ये नीरव मोदीच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदीपासून आम्हाला लांब ठेवण्यात यावे , यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत तपास यंत्रणांना करणार असल्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. नीरव मोदीच्या घोटाळ्यासंदर्भातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली आहे. नीरव मोदीची बहिण पूर्वी मेहता व तिचा पती मयांक मेहता यांनी काही महिन्यापूर्वी ही याचिका दाखल केली होती.
हेही वाचा-सोन्याच्या दरात ३५८ रुपयांची घसरण; चांदी १५१ रुपयांनी महाग
मेहता हिच्याकडे बेल्जियम नागरिकत्व आहे. तर तिच्या पतीकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमध्ये नीरव मोदी प्रकरणामुळे त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्य तणावाखाली आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण संदर्भात दोन प्रकरणांमध्ये आपण पुरावे देऊ शकतो, असे या दोघांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते.