मुंबई -रुग्णांकडून अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध खरेदी केली जाते. ही बाब गंभीर असून या विरोधात राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करताना आढळल्यास, ( No Medicine Without Prescription ) संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ( Minister rajendra patil yadravkar ) यांनी दिली.
राज्यात अनेकदा रुग्णांकडून विविध आजारांच्या गोळ्या खरेदी केल्या जातात. नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय अशी औषधे खरेदी केल्याचा प्रकार औरंगाबाद शहरात समोर आला होता. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.