मुंबई -राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ( Maharashtra Government Shops Marathi Board ) घेतला आहे. मात्र, तरीही मराठी पाटी न लावल्याने उत्तर मुंबईतील एका रुग्णालयाच्या बोर्डवर युवक काँग्रेसने काळे फासले ( Congress Black Ink Board Hospital In Mumbai ) आहे.
मराठी पाट्यांबाबत महाराष्ट्र सरकारने नियमावली जाहीर केली ( Maharashtra Government Shops Marathi Board ) आहे. याबाबत बोरीवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला आपले नाव तसेच, आकारण्यात येणारे सेवा शुल्क प्रदर्शित करून नावाचा फलक मराठीमध्ये बदलण्याचा युवक काँग्रेसने अल्टिमेटम दिला होता. तरीही त्याची अंमलबजावणी न करण्यात आल्याने शेवटी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाची नेम प्लेट काळी करण्यात आली आहे.