मुंबई -गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात टिपू सुलतानच्या नावावरुन वादंग निर्माण झाले आहे. त्यात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्या उद्यानाच्या नावावरुन स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईतील मालाडमध्ये महापालिकेकडे टिपू सुलतानच्या नावावर अधिकृतपणे कोणतेही उद्यान नाही, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मालाडमध्ये टिपू सुलतानच्या नावावर मुंबई महापालिकेकडे कोणतेही अधिकृत उद्यान नाही. टिपू सुलतान उद्यान नामक फलक तेथील स्थानिक आमदाराने लावला आहे. त्यांच्याशी आम्ही याबाबत बोलत आहोत, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.
भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन -
मुंबई मालाड येथील मालवणीच्या टिपू सुलतान मैदानाबाबत आता राजकारण चांगलेच तापले असून, टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाले. मात्र त्याआधी भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने सातत्याने आंदोलन केले. आणि आरएसएसचे लोक सातत्याने मागणी करत आहेत की टिपू सुलतानच्या नावाने मैदान आहे. या मैदानाचे नामांतर करू नये, त्याला विरोध करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी आधीच चांगली तयारी होती, मात्र असे असतानाही बजरंग दल, भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांनी मैदानापूर्वीच सुमारे 500 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले होते. जिथे आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत होते. उद्घाटन स्थळापूर्वीच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.