मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांसंबंधी स्वतः आमदार प्रताप सरनाईक यांनी खुलासा करताना त्यांना कुठल्याही प्रकारचे ईडी समन्स आलेले नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या घरातून ईडीला कुठल्याही प्रकारचे क्रेडीट कार्ड मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आमदार प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
मला बदनाम करण्याचे षडयंत्र
आमदार सरनाईक गेल्या गुरुवारी ईडी कार्यालयमध्ये चौकशीसाठी हजर झाले असता, त्यांची पाच तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 'माझ्या उत्तरांनी अधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे की नाही, हे मला माहीत नाही,' असे सरनाईक यांनी म्हटले होते. तसेच, गरज वाटेल तेव्हा ईडीच्या सांगण्यानुसार मी चौकशीसाठी पुन्हा हजर होईन, असेही त्यांनी म्हटले आहे.