महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cruise Drug Case : आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कट कारस्थानही रचले नाही - मुंबई उच्च न्यायालय - mumbai high court on cruise drug case

मुंबईत 2 ऑक्टोबरला क्रूझवर ड्रग पार्टी(Cruise Drug Case) सुरू असताना त्यावर एनसीबीने(NCB raid on Cruise) छापा टाकला होता. यात ड्रग्ज सापडले होते. मात्र, आर्यन खानकडे(Aryan Khan) कोणतेही ड्रग सापडले नसल्याचे निदर्शनास आले नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) म्हटले आहे.

cruise drug case
आर्यन खान आणि मुंबई हायकोर्ट

By

Published : Nov 20, 2021, 4:44 PM IST

Updated : Nov 20, 2021, 6:44 PM IST

मुंबई -क्रूझ ड्रग पार्टी(Cruise Drug Case) प्रकरणात आर्यन खानकडे(Aryan Khan) ड्रग्ज सापडले नाही. त्याच्या Whats App चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचे आढळून आले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या ऑर्डर कॉपीमध्ये ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे एनसीबीच्या(NCB) तपासावरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • NCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह -

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यावर NCB कडून कारवाई करण्यात आली होती. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यास जवळपास महिनाभर कोठडीत राहावे लागले होते. हायप्रोफाईल अशा या प्रकरणावरून राज्यात मोठे राजकारण तापले, ज्याची धग अजूनही जाणवतच आहे. या प्रकरणात ड्रगचे कट रचल्याचे कलम NCB कडून लावण्यात आले होते. पण, त्याबाबत पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आले नाहीत. त्यामुळे NCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्यनच्या चॅटमध्ये अरबाज, मुनमून यांच्यात पार्टीबाबत ड्रग नेण्यासंदर्भात कोणतेही चॅट आढळून आले नाहीत. NCB आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या कथित कबुली जबाबावर विसंबून राहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अशी विधाने पुराव्यात अमान्य आहेत असे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यात ड्रगशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, जेणेकरुन संबंधित वेळी त्यांनी ड्रगचे सेवन केले होते की नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात नोंदवले आहे. या तिघांविरोधात एनसीबीकडे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

  • प्रकरण काय आहे?

मुंबईत 2 ऑक्टोबरला क्रूझवर पार्टी सुरू असताना त्यावर एनसीबीने छापा टाकला होता. यात ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी अनेकांना एनसीबीने अटक केली होती. त्यात आर्यन खानचाही समावेश होता. आर्यनला 28 ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. त्यानंतर 29 ऑक्टोबरला तो आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल 25 दिवसानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.

  • आज न्यायालयाने काय म्हटले?

आर्यन खानचा गुन्हा करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण यात नोंदवले आहे. त्याशिवाय या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएसचे 29 कलम लावले होते. कट रचल्याबाबतचे हे कलम होते. ते योग्यरित्या लावले का हे आम्हाला तपासावे लागेल. तसेच या बाबतचे पुरावे आहेत का हेसुद्धा आम्हाला तपासावे लागेल.

  • कोण आहे आर्यन खान?

आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांचा सर्वात मोठा मुलगा आहे. तो 23 वर्षांचा आहे. त्याने लहानपणीच काही चित्रपटांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये द लायन किंग, द इन्क्रेडिब्ल्स (हम है लाजवाब) यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

  • आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राजकारण -

NCB ने क्रूझवर केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ही कारवाई कशी खोटी आहे हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक रोज एक ट्विट करत खुलासे करून दाखवत आहेत. दुसरीकडे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. दरम्यान, हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पंच प्रभाकर साईल यानेही समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. सध्या या सर्व प्रकरणांची एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे.

Last Updated : Nov 20, 2021, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details