मुंबई : मार्च-एप्रिलमधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ ते दहा हजारांच्या दरम्यान स्थिरावली आहे. त्यामुळे अजुनही कोरोनाचा धोका संपला नसल्याचेच यावरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन केले जात आहे.
जुलैमध्ये आतापर्यंत दैनंदिन सरासरी सुमारे 8700
जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये दररोज आठ ते दहा हजारांच्या दरम्यान नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्युदरातही किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुसरी लाट कमी झाली असली तरी पूर्णपणे ओसरली नसल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अजुनही पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या वर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10- 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण