महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shide Tweet : अद्याप मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा नाही; एकनाथ शिंदेंचा खुलासा - Dont believe On rumors

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट ( Eknath Ehide Tweet ) करत अद्याप भाजपसोबत मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही याद्या तयार केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये ( Don't believe On rumors ) असे ट्विट बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

eknath shinde
एकनाथ शिंदे

By

Published : Jun 30, 2022, 12:03 PM IST

Updated : Jun 30, 2022, 12:11 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( opposition leader devendra fadnavis ) यांच्या सत्तास्थापनेच्या हलचालींना सुरूवात झाली आहे. खातेवाटप झाल्याच्या वावड्या उठल्या जात आहेत. मात्र अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून ( No discussion on ministerial post ), लवकरच होईल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे ( Shiv Sena ) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदे ट्विट

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अद्याप भाजपसोबत मंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. कोणत्याही याद्या तयार केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे ट्विट बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel mla eknath shinde ) यांनी केले आहे.एकीकडे एकनाथ शिंदे जरी ट्विटच्या माध्यमातून असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र चर्चेच्या फेरी सुरू झाल्या आहेत. लवकरच याबाबतची स्पष्टता होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून विशेषता शिवसैनिकातून एकनाथ शिंदे यांच्या गटाला होत असलेला विरोध पाहता आम्ही शिवसैनिकच आहोत आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी आणखी एका ट्विट ( Eknath Ehide Tweet ) च्या माध्यमातून स्पष्ट करीत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदे ट्विट

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पन्नास आमदार ( 50 MLA ) गळायला लावले. ठाकरे सरकार यामुळेच कोसळले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याबाबत वाटाघाटी सुरू असून असे वाटप झाल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. मात्र भाजपसोबत कोणती आणि किती मंत्री पदे येतील याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. लवकरच होईल मात्र तोपर्यंत कोणत्याही याद्या आणि त्याबाबत असलेले अफवा पसरवू नका ( Don't spread rumors ) असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे आज गोव्यातून मुंबईत येण्याची शक्यता आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक होईल. त्यामध्ये खाती वाटपाबाबत चर्चा होणार आहे. शिंदे गटाच्या वाट्याला किती खाती येतील हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा -BJP Will Claim Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

Last Updated : Jun 30, 2022, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details