मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या ३ हजार ३७ शाळा बंद (School Closed) करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज शालेय शिक्षण विभागाने याबाबत खुलासा करत शाळा बंद करण्याच्या चर्चेला फुलस्टॉप लावलेला आहे. राज्यातील कोणत्याही कमी पटसंख्या (Fewer Attendance School) असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा (Vandana Krishna) यांनी दिली आहे.
- शाळा बंद करण्याचा निर्णय नाही -
केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांना जवळच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर केंद्र पुरस्कृत योजना काही वर्षांपासून सुरू असून त्यानुसार विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहतूक भत्ता देण्यात येतो. मात्र अद्यापपर्यंत वाहतूक भत्ता दिल्यामुळे कोणतीही शाळा बंद करण्यात आलेली नाही, असे शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासन कमी पटसंख्या असलेल्या ३ हजार ३७ शाळा बंद करणार आहेत अशी माहिती प्रसारमाध्यमांवर आली होती. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती कृष्णा यांनी दिली आहे.
- शुद्धीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली -