मुंबई - दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी म्हटलं की मुंबई ठाणे तसेच सर्वत्र शहरात उंच उंच थर लावताना बालगोपाल दिसतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सर्वत्र दहीकाला उत्सव रद्द झाले आहेत. दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या दिनी दादर माटुंगा, सायन, परळ, लालबाग या भागात मोठे-मोठे दहीहंडी उत्सव होत असतात. मात्र, यंदा असे काही दृश्य पाहायला मिळत नाही. याबद्दल आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
मुंबईत यंदा दहीहंडी नसल्याने परिसर ओस, गोविंदांच्या आनंदावर विरजण - गोपाळकाला न्यूज
विविध भागातून अनेक दहीहंडी मंडळ शहरात मुख्य ठिकाणी दहीहंडीची सलामी व दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. हा दहीकाला उत्सव पाहण्यासाठी विविध शहरातील लोकं दादर-माटुंगा या परिसरात येतात. गोविंदा आला रे आला असा जयघोष करणाऱ्या तरुणाईसाठी हा उत्साहाचा क्षण असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सवावर सावट आले आहे.
विविध भागातून अनेक दहीहंडी मंडळ शहरात मुख्य ठिकाणी दहीहंडीची सलामी व दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात. हा दहीकाला उत्सव पाहण्यासाठी विविध शहरातील लोकं दादर-माटुंगा या परिसरात येतात. गोविंदा आला रे आला असा जयघोष करणाऱ्या तरुणाईसाठी हा उत्साहाचा क्षण असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सवावर सावट आले आहे. दरवर्षीची दहीहंडी उत्सवाला होणारी गर्दी यंदा रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी प्रेमींच्या आनंदावर सध्या विरजण पडल्याचे दिसत आहे.
दहीहंडीची मोठा उत्सव ओळखल्या जाणाऱ्या दादरमध्ये यंदा शुकशुकाट पाहायला मिळत आहे .सर्व आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षांनी देखील हा सण रद्द करून आपापल्या परीने मंडळात व घरीच गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा-अर्चा करून साजरा केला आहे.