मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ऑर्थर तुरुंगामधील मुक्काम आणखी काही दिवस ( Anil Deshmukh stay extended in jail ) वाढला आहे. कारण, मुंबई सत्र न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना जामिन ( Mumbai court on ex Minister Deshmukh bail ) दिला नाही.
100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore extortion case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी वकिलामार्फत 4 जानेवारी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आज मंगळवार (दि.11) रोजी सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम ( Anil Deshmukhs advocate Aniket Nikam ) यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आज अनिल देशमुख यांना जामीन दिला नाही. या अर्जावर 13 जानेवारी रोजी सुनावणी ( Next hearing on Anil Deshmukh case 13th Jan ) होणार आहे.
हेही वाचा-Chandiwal Commission update : अनिल देशमुख यांच्या पीएसने चांदीवाल आयोगात दिली 'ही' महत्त्वाची माहिती
ईडीकडून अनिल सिंग हे न्यायालयासमोर मांडणार बाजू आहेत. यापूर्वीदेखील न्यायालयात ईडीकडून अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध झाला आहे. त्यामुळे 13 जानेवारीला सॉलिसिटर जनरल अनिल सिंग काय नवीन युक्तीवाद करतात हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा-Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज मुंबई सत्र न्यायालयात फैसला
काय आहे ईडीचे म्हणणे?
अनिल देशमुखयांनी दाखल केलेल्या जामिनासाठी अर्ज हा अवैध असल्याचे ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसांच्या आत आरोप पत्र चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही, असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा-Anil Deshmukh : देशमुखांच्या मालमत्ता जप्ती याचिकेवर 19 जानेवारीपर्यंत कारवाई करु नये - मुंबई उच्च न्यायालय
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.