महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Raut On Fake MSEB Message : वीज देयकाबाबत खोटे संदेश पाठवणाऱ्यांवर कारवाई करणार - ऊर्जामंत्री नितीन राऊत - वीज देयक खोटे संदेश बातमी

राज्यातील अनेक ग्राहकांना मोबाईलवर ( Fake MSEB Message ) आपले थकीत वीजबील रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान भरा, अन्यथा आपली वीज कापली जाईल, अशा पद्धतीचे संदेश पाठवण्यात येत आहेत. राज्यातील अनेक वीज ग्राहकांची अशी फसवणूक झाल्याच्या तक्रारी राज्याच्या ऊर्जा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut Statement On Fake MSEB Message ) यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

Nitin Raut On Fake MSEB Message
Nitin Raut On Fake MSEB Message

By

Published : Jan 20, 2022, 5:31 PM IST

Updated : Jan 20, 2022, 6:42 PM IST

मुंबई -राज्यातील अनेक ग्राहकांना मोबाईलवर ( Fake MSEB Message ) आपले थकीत वीजबील रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान भरा, अन्यथा आपली वीज कापली जाईल, अशा पद्धतीचे संदेश पाठवण्यात येत आहेत. वीज कापली जाऊ नये, या भीतीने ग्राहकांनी बिलाचा भरणा सदर संदेशातील लिंकवर केल्यानंतर या व्यक्तीची रक्कम थेट खोटे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा होते. राज्यातील अनेक वीज ग्राहकांची अशी फसवणूक झाल्याच्या तक्रारी राज्याच्या ऊर्जा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut Statement On Fake MSEB Message ) यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

प्रतिक्रिया

सायबर विभागाला कारवाई करण्यासाठी निर्देश -

खोटे संदेश मोबाईलवर पाठवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. महावितरण रात्री-अपरात्री ग्राहकांना संदेश पाठवून बील भरण्यासाठी कधीही सांगत नाही. त्यामुळे ग्राहकांनीही सतर्क राहून केवळ अधिकृत पेमेंट गेटवेचाच वापर करावा, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

खातरजमा कशी करणार? -

महावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापरलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ व व्हॉट्स अ‍ॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, अशी प्रतिक्रिया महावितरणकडून देण्यात आली आहे.

शंका आल्यास यांच्याशी बोला -

मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा -Mayor Kishori Pednekar on BJP : हत्तीच्या पिल्लाचे 'चंपा', माकडाच्या पिलाचे नाव 'चिवा' ठेवू - महापौर पेडणेकर

Last Updated : Jan 20, 2022, 6:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details