मुंबई- वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी मंगळवारी दुपारी दोन वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यापूर्वी आपण प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.
दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही ( notice of Electricity company strike ) दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा ( Mohan Sharma on employees Strike ) यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. मात्र, वीज कंपनी व्यवस्थापनाच्या ( Electricity company management ) असंवेदनशील धोरणाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-Power Board Employees Strike Nagpur : नागपुरात खासगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन
संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो. तुम्ही बैठकीची वेळ निश्चित करा. शक्य असेल तर उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलावतो. मी एक पाऊल पुढे टाकले आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन बैठकीला हजर रहा. संप मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले.
हेही वाचा-Minister Nitin Raut Statement Nagpur : 'कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'