मुंबई -मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर गंभीर आरोप केले. त्यांना बळजबरीने गुरजातमध्ये नेल्याचे ते म्हणाले होते. मात्र, देशमुखांच्या या आरोपानंतर आता शिंदे गटाने या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. देशमुख यांना कोणतीही मारहाण केली असून आम्ही त्यांना विमानाने महाराष्ट्रात पाठवल्याचे म्हटले आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
नितीन राऊतांनी केले होते आरोप -मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला काहीही झालेले नाही. मी त्या हॉटेलमधून रात्री तीन वाजता निघालो होते. त्यावेळी शेकडोच्या संख्येने गुजरात पोलीस आले व मला जबरदस्ती उलचून सुमारे 25 दवाखाने फिरवले. जबरदस्तीने माझ्या दंडात इंजेक्शन देण्यात आले व मला हृदयविकाराचा झटका आला, अशी अफवा पसरवली. मी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.