मुंबई -नितेश राणे यांच्या जामिनावर 17 जानेवारी निकाल येणार आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर निकाल लागणार आहे. तोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा नितेश राणे यांना कायम असणार आहे.
हेही वाचा-Santosh Parab Attack : मुंबई उच्च न्यायालकडून नितेश राणे यांना दिलासा कायम; गुरुवारी पुन्हा सुनावणी
राणेंना अटक होणार?
सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले आहे. राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता उच्च न्यायालयात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
हेही वाचा-आमदार नितेश राणेंना तात्पुरता दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक टळली