मुंबई :भाजप आमदार तसेच नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांचे पुत्र नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी उद्धव ठाकरे ( Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये अत्यंत टोकाचे वाद झाले होते. त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला ( Shiv Sena Youth Leader Aditya Thackera ) आहे. ट्विटरच्या माध्यमातून ( Nitesh Rane Tweets ) त्यांनी हा आरोप केला ( Sensational Allegation ) असून, त्यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नितेश राणेंचे ट्विट : भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले की, माझे वडील नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मारण्याची सुपारी दिली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा शांत आणि सोबर चेहरा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. पण, तो खरा नाही. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. तसेच, पुढे अजूनही त्यांचे वस्त्रहरण करू, असा इशाराही नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसेच, आदित्य यांच्यावर निशाणा ( Nitesh Rane Targets Aditya Thackeray ) साधत, त्यांची म्याॅंव म्याॅंव संपू दे, नंतर मी यांचे आणखी किस्से बाहेर काढून, वस्त्रहरण करीत राहणार. नितेश राणेंच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.