मुंबई - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज विधानसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता कामकाज सुरु होण्याअगोदर विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून भाजपा आमदार सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. त्याच दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात आले असता, विरोधकांनी म्याऊ-म्याऊ-म्याऊ-म्याऊ ( Nitesh rane teased aaditya thackeray ) अशा घोषणा देत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शेष म्हणजे आमदार नितेश यांनी हा शब्द अगोदर उच्चारला व त्याला इतर आमदारांनी साथ दिली. यावेळी भाजपाचे नेते हसताना पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे येताच विधान भवनाच्या पायर्यांवर बसलेल्या नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा
हिवाळी अधिवेशनाला (Winter session 2021) बुधवारपासून सुरुवात झाली. आज विधानभवन परिसरात विचित्र प्रकार घडला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या ( Nitesh rane teased aaditya thackeray ) घोषणा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात येत आहे. परंतु कालपासून मुख्यमंत्री विधानभवनात हजर न झाल्याने विरोधक आक्रमक झाले. अधिवेशनाला मुख्यमंत्री येऊ शकत नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कारभार कोणाकडे तरी द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. परंतु त्यांचा कोणावरच विश्वास नाही, असे सांगत त्यांनी तो कारभार त्यांचे पुत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तरी द्यावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पेंग्विनचे बारसे लांबणीवर -
यापूर्वीही भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची नक्कल केली होती. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये पेंग्विनचा विषय पेटलेला असताना दोनच दिवसापूर्वी नवीन जन्माला आलेल्या पेंग्विन पिल्लाचे ठरलेले बारसे महापौरांना अधिवेशन असल्या कारणाने पुढे ढकलण्यात आले होते. कारण हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला तर शिवसेना टीकेची धनी झाली असती. हाच मुद्दा पकडून आता आदित्य ठाकरे यांना डिवचण्याच्यासाठी म्याऊ-म्याऊ-म्याऊ-म्याऊ अशा घोषणा दिल्या गेल्या तर नाहीत ना, अशी चर्चा दबक्या आवाजात विधानभवन परिसरात सुरू झाली आहे.
हेही वाचा -Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचे ताजे अपडेट, एका क्लिकवर...