मुंबई - दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी ( Disha Salian Murder Case ) आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या ( Nitesh Rane Tweet On Disha Salian Murder Case ) माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहे. दिशा सॅलियन ला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले नितेश राणे -
'दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे, जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. काही संबंध आहे का?'
'मालवणी पोलिसांनी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नव्हती, त्यामुळे हे प्रकरण देण्यात आले होते. आता त्याच पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश राज्य महिला आरोगाने दिले आहे. या प्रकरणात कोण आरोपीला वाचवते आहे', असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
हेही वाचा -Sameer Wankhede Bar Permit Case : गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात; तर ठाण्यात कोपरी पोलिसांचे चौकशीसाठी समन्स