महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंचा इशारा! - नारायण राणेंना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका चित्रपटातील "करारा जवाब मिलेगा" या डायलॉगचा व्हिडिओ नितेश राणे यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून नितेश यांनी शिवसेनेला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंचा इशारा!
करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंचा इशारा!

By

Published : Aug 25, 2021, 2:45 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका चित्रपटातील "करारा जवाब मिलेगा" या डायलॉगचा व्हिडिओ नितेश राणे यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून नितेश यांनी शिवसेनेला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

करारा जवाब मिलेगा...

राजनीती या चित्रपटातील अभिनेते मनोज वाजपेयी हे एक भाषण करतानाच्या प्रसंगाचा तेवीस सेकंदांचा व्हिडिओ नितेश राणेंनी ट्विट केला आहे. एका सभेला संबोधित करत असलेले मनोज वाजपेयी अतिशय त्वेषाने भाषण करत असल्याचे यात दिसते. "मगर आसमाँ में थूँकनेवाले को शायद ये पता नहीं है... की पलट के थूँक उन्हीं के चेहरे पे गिरेगी... करारा जवाब मिलेगा... करारा जवाब मिलेगा..." असा डायलॉग मनोज वाजपेयी या व्हिडिओत बोलताना दिसतात.

शिवसेनेला इशारा?

नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभर चाललेले अटकनाट्य आणि त्यानंतर रात्री त्यांना मिळालेला जामीन, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी हा व्हिडिओ टाकून शिवसेनेला इशारा दिल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया युझर्सकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -राणेंना आव्हान देणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री ठाकरेंनी थोपटली पाठ

ABOUT THE AUTHOR

...view details