मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित सुमारे 269 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी घेऊन संबंधित विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
माहिती देताना भाजप नेते नितेश राणे हेही वाचा -Police Constable Suicide : कर्जबाजारीपणामुळे सोलापुरातील पोलीस हवालदाराची मुंबईत आत्महत्या
प्रगतिशील महाराष्ट्रात शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. शाळेच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर राज्य सरकार आणि महापालिकेचे लक्ष असणे गरजेचे आहे, त्यांचे योग्य नियमन करणे हे कर्तव्य आहे, मात्र मुंबईत शिक्षणाच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावले जात आहे, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी -मुंबई महानगरपालिकेत २ हजार ६९ शाळा या अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. देखाव्यापूर्ती या शाळांना महापालिका नोटीस बजावते. मात्र, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई राज्य सरकारकडून होत नाही. एकीकडे मुंबई महापालिकेच्या शाळांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे अनधिकृत शाळांचे रॅकेट चालवायचे, हा खटाटोप गेल्या दहा वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप करीत, या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचा आरोपही राणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच या 269 शाळांमधील मुलांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी राणे यांनी केली.
रस्त्यावर उतरून लढण्याचा इशारा -या अनधिकृत शाळांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य शिक्षण देण्याबाबत सरकारने लवकरात लवकर कारवाई केली नाही आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशाराही भाजप नेते राणे यांनी दिला.
हेही वाचा -Raj Thackeray : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना 'होमवर्क'; सर्व मतदारसंघात मनसेच्या सभा, मेळावे