मुंबई - आईच्या बिजांडावर 14 कोटी शुक्राणुंचा प्रवेश होतो. त्यातील एका शुक्राणुमुळे तुमचा जन्म होतो. म्हणजे 13 कोटी 99 हजार 999 शुक्राणुंवर मात करून तुम्ही जन्म घेता. त्यामुळे तुम्ही आयुष्याची पहिली शर्यंत आईच्या पोटातच जिंकली असल्याने स्पर्धा परीक्षेची शर्यंत चिल्लर असल्याचे परखड मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि फिनिक्स करिअर डेव्ल्पमेंट अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखत व्यक्त केले. जीवनात अनेक संकट येत असतात, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसल्याचंही ते म्हणाले.
'प्लान बी' तयार ठेवा -
राज्यात एमपीएससीची तयारी करणारे जवळपास सात ते आठ लाख विद्यार्थी आहेत. मात्र पाचशे ते सहाशेच्यावर पदांची भरती होत नाही. मग इतक्या मोठ्या स्पर्धेत टिकणं खूप कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने 'प्लान बी' तयार करून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्यासाठी पुढील मार्ग मोकळा राहील, असे मतं नितेश कराळे यांनी मांडले.
संपूर्ण मुलाखतीसाठी -व्हिडिओ पाहा बे पोट्टेहो! : स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, राजकारण आणि सरांची गर्लफ्रेन्ड...