मुंबई - शहर आणि उपनगर परिसरात काही वेळातच निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. यासाठी मुंबई महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 35 ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय पालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. या निवाऱ्यांमध्ये समुद्र किनारी भागात राहणाऱ्या 10,840 नागरिकांना हलवण्यात आले आहे.
मुंबई समुद्र किनाऱ्यालगतच्या 10,840 नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी - mumbai nisarga cyclone news
निसर्ग चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केले आहे. किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आले आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांचे स्थलांतर
हेही वाचा...निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने, सिंधुदुर्गात परिस्थिती सामान्य