महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Auction of Nirav Modi Property : नीरव मोदीच्या 'या' संपत्तीचा होणार लिलाव; ईडीची कारवाई

हिरा व्यापारी नीरव मोदीच्या ( Nirav Modi ) संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. नीरव मोदीची एक हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव होणार ( Auction of Nirav Modi's Property ) आहे. त्यामध्ये मुंबईतील संपत्तीचा देखील समावेश आहे.

Nirav Modi
नीरव मोदी

By

Published : Dec 25, 2021, 3:51 PM IST

Updated : Dec 25, 2021, 4:02 PM IST

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा ( Punjab National Bank Scam ) करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदीच्या ( Nirav Modi ) संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. नीरव मोदीची एक हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव होणार ( Auction of Nirav Modi's Property ) आहे. त्यामध्ये मुंबईतील संपत्तीचा देखील समावेश आहे. यापूर्वीही ईडीकडून अशाप्रकारे लिलाव करण्यात आला होता. त्या लीलावामधून तपास यंत्रणेने मोदींच्या मालकीच्या कार, पेंटिंग्ज आणि इतर महागड्या वस्तूंचा लिलाव करून यापूर्वी वसूल केलेले 6 कोटी रुपये पीएनबीला सुपूर्द केले आहेत. आता पुन्हा नीरव मोदी यांची मुंबईतील उर्वरित काही संपत्ती लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ईडीने नीरव मोदीची 1 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये काळा घोडा येथीस रिदम हाऊस म्युझिक स्टोअर असलेली इमारत, नेपन्सी रोड फ्लॅट, कुर्ला येथील कार्यालयीन इमारत आणि दागिने यांचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी नीरव मोदीच्या संपत्तीचे लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी लिक्विडेटरची नियुक्ती केली आहे.

मुंबईतील ही मालमत्ता ईडीच्या ताब्यात राहणार

नीरव मोदींच्या ज्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या नव्हत्या. त्यामध्ये वरळीतील समुद्र महल इमारतीतील १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे त्याचे चार भव्य फ्लॅट, त्याचा अलिबाग बंगला आणि जैसलमेरमधील पवनचक्की, ईडीच्या ताब्यात राहतील. मोदीने पीएनबीची फसवणूक केलेल्या पैशातून यातील अनेक मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.

नीरव मोदीची मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता

नीरव मोदीचे मुंबईतील वरळी येथील समुद्र महल नावाच्या इमारतीतील 100 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे भव्य चार फ्लॅट आहेत. भारतातून फरार होण्यापूर्वी नीरव मोदी कुटुंबियांसह या अपार्टमेंटमध्ये राहत होता. नीरव मोदी याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही आहे, ही सर्व संपत्ती जप्त केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाजवळ कालाघोडा भागात नीरव मोदीचे 3500 चौरस फुटांचे रिदम हाऊसच्या नावाने एक मोठं म्युझिक स्टोअर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील ब्रीच कँडी रोडला लागून असलेल्या एका उंच इमारतीत फ्लॅट आहे. तो देखील जप्त केला जाणार आहे. मुंबईतील ओपेरा हाऊसमध्ये 3 फ्लॅट आहेत. मुंबई, जयपूर, सूरत येथे फोरस्टार डायमंड्स कंपनीच्या नावावर कार्यालये आहेत. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये 1 आलिशान कार्यालय आहे. महाराष्ट्रात अलिबागच्या समुद्रकिनारी एक बंगला आहे. हा बंगलाही नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप आहे.

Last Updated : Dec 25, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details