मुंबई - गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटाची आपत्ती येत आहे. कधी निसर्ग चक्रीवादळ तर कधी चुकते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरची गावे उद्ध्वस्त केली. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुरग्रस्त झाला होता. मात्र, या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नेहमीच एनडीआरएफची ( NDRF ) तुकडीला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पाचारण करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा या पावसाळ्यात धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राज्याच्या 7, जिल्ह्यात 9 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 31 मे) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती मंगळवारी (दि. 31 मे) मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.