महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर; ठेकेदाराला अटक

मालाडमध्ये इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू
मालाडमध्ये इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू

By

Published : Jun 10, 2021, 6:15 AM IST

Updated : Jun 11, 2021, 12:13 PM IST

12:11 June 11

मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी ठेकेदाराला अटक

मुंबई - मालवणी इमारत दुर्घटना प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठेकेदार रमजान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच इमारतीचा मालकदेखील या प्रकरणात आरोपी आहे. 

22:38 June 10

मृतांची नावे -

(१) साहिल सय्यद (मुलगा/ ९ वर्ष )
(२) आरिफा शेख ( मुलगी/ ९ वर्ष )
(३) जोहन इरराना (मुलगा / १३)
(४) शफीक सिद्दीकी (पुरुष /४० वर्ष)
(५) तौसिफ़ सिद्दीकी (मुलगा / १५ वर्ष)
(६) अलिशा सिद्दीकी (मुलगी / १० वर्ष)
(७) अलफिसा सिद्दीकी (मुलगी / दीड वर्ष)
(८ ) अफिना सिद्दीकी (मुलगी / ६ वर्ष)
(९) इशरत बानो सिद्दीकी (महिला / ४० वर्ष)
(१०) रहिसा बानो सिद्दीकी (महिला / ४० वर्ष)
(११) तहेस सिद्दीकी (मुलगा / १२ वर्ष)
(१२) अनोळखी (पुरुष / ६० वर्ष)

22:37 June 10

मालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार -

मुंबई - मालाड मालवणी येथील इमारत दुर्घटने प्रकरणी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या मालकासह ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर इमारतीच्या मालकाने इमारतीची किरकोळ डागडुजी केली होती. अशी माहिती मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली

22:35 June 10

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर

मुंबई -मालाड, मालवणी येथे काल रात्री ११ च्या सुमारास एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी शोध कार्य सुरु असताना ढिगाऱ्याखालून आणखी एका व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे मालाड दुर्घटनेत जखमींची आकडा १९ वर तर मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटूंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

19:46 June 10

मुंबईतील आतापर्यंतच्या मोठ्या इमारत दुर्घटना

  • 21 सप्टेंबर 2020 - भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली होती. यात दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 25 ऑगस्ट 2020 - रायगड जिल्ह्यातील महाड येथे पाच मजली इमारत कोसळली होती. यात 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 9 जण जखमी झाले होते.
  • 4 ऑगस्ट 2015 - ठाणे रेल्वे स्टेशनजवळील 50 वर्ष जुनी इमारत कोसळली होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले होते.
  • 31 ऑगस्ट 2017 - साऊथ मुंबईमधील भेंडी बाजार येथे 117 वर्ष जुनी हुसेनी इमारत कोसळली होती. यात 24 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
  • 25 जुलै 2017 - घाटकोपरमधील एलबीएस मार्गावरील चार मजली सिद्धी साई इमारत पडली होती. यात 17 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 27 स्पटेंबर 2013 - मुंबईतील माझगाव भागातील पाच मजली इमारत कोसळली होती. यात जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला होता, तर 32 जण जखमी झाले होते.
  • 4 एप्रिल 2013 - ठाण्यातील मुंब्रा भागात मोडकळीस आलेली इमारत कोसळली होती. यात 74 जणांचा मृत्यू झाला होता. यात 18 लहान मुलं, 33 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश होता. तर, 100 पेक्षा अधिक जण या दुर्घटनेत जखमी झाले होते.

16:36 June 10

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच घटनेची घेतली होती माहिती

मुंबई -मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली. तसेच मदत व बचावकार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशामक दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचावकार्य करत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले. 

16:35 June 10

मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

मुंबई :मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

14:28 June 10

मालाड दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

मुंबईत मालाड पश्चिम इथे  इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

14:27 June 10

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर; पंतप्रधानांनी केले दु:ख व्यक्त

मुंबई -मालाड दुर्घटनेतील मृता्ंच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाखांची तर, जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

13:40 June 10

मुख्यमंत्री ठाकरेंनी मालाड दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी रहिवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय ( शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर पेडणेकर उपस्थित होते.

13:39 June 10

मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत - मुख्यमंत्री ठाकरे

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.


 

10:31 June 10

मालवणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार - नागरे पाटील

मालाड मालवणी येथील इमारत दुर्घटने प्रकरणी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या मालकासह ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर इमारतीच्या मालकाने इमारतीची किरकोळ डागडुजी केली होती. अशी माहिती मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिली

08:44 June 10

मालवणी दुर्घटनेत मृतांचा आकडा 11; मृतामध्ये 8 लहान मुलांचा समावेश

मुंबई - मालाड, मालवणी येथे बुधवारी रात्री ११ च्या सुमारास एक दुमजली घर शेजारील घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत ७ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. कोसळलेल्या घराचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली कोणी अडकले आहे का त्याचाही शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे. 

११ जणांचा मृत्यू-

मृतांची नावे - 
(१) साहिल सर्फराज सय्यद (मुलगा/ ९) 
(२)आरिफा शेख ( मुलगी/८) 
(३)जोहन इरराना (मुलगा / १३)
(४) ४० वर्षीय व्यक्ती ( नाव माहीत नाही)
(५) १५ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)
(६)८ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(७) ३ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(८ ) ५ वर्षीय मुलगी ( नाव माहीत नाही)
(९) ३० वर्षीय महिला ( नाव माहीत नाही)
(१०)५० वर्षीय महिला (नाव माहीत नाही)
(११) ८ वर्षीय मुलगा ( नाव माहीत नाही)

जखमींची नावे - 
(१) मरीकुमारी हिरांगणा ( महिला ३० गंभीर) 
(२)धनलक्ष्मी ( महिला / ५६)
(३)सलमा शेख (महिला / ४९)
(४)रिझवान सय्यद (महिला /३५)
(५)सुर्यमणी यादव ( पुरुष / ३९)
(६) करीम खान ( पुरुष /३०)
(७) गुलजार अहमद अन्सारी ( पुरुष / २६)

08:02 June 10

मालाड इमारत दुर्घटनेत एकूण 18 जणांचे वाचवले प्राण

बुधवारी रात्रीपासून एकूण 18 नागरिकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. पोलीस या दुर्घटनेचा संपूर्ण तपास करणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

07:33 June 10

अग्निशामक दल पोलिसांकडून बचाव कार्य सुरू,

मालाड दुर्घटना घटनास्थळी बचावकार्य

मालाड इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि मुंबई पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. जेसीबी मशीनच्या सह्यायाने ढिगारा हटवण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

07:04 June 10

मालाड इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; एकूण ११ मृत्यू

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी आहगेत. मृतांमध्ये 7 बालकांचा समावेश आहे. मृतापैकी 2 महिला आणि एक पुरुष आणि 5 बालकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

06:32 June 10

घटनास्थळा शेजारील इतर तीन इमारतीमधील रहिवाश्यांना केले स्थलांतरीत

मालाड दुर्घटना घटनास्थळी बचावकार्य

मालाड मालवणीमधील न्यू कलेक्टर कम्पाऊंडमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडलेनंतर या इमारतीच्या शेजारील ३ धोकादायक इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

06:26 June 10

मुसळधार पावसाने कोसळली इमारत; बचाव कार्य सुरू - मंत्री अस्लम शेख

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळेही इमारत कोसळली आहे. बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीचा कोसळलेला ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यात कोणी अडकले आहे याची खात्री करण्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
 

06:22 June 10

दुर्घटनास्थळा शेजारील अन्य एक धोकादायक इमारत रिकामी करण्याचे काम सुरू

LIVE UPDATES मालाड इमारत दुर्घटना

दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

06:18 June 10

१५ जणांना सुखरुप काढले बाहेर, आणखी काही जण अडकल्याची भिती

LIVE UPDATES मालाड इमारत दुर्घटना

मालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले.अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. मुंबई महापालिके झोन ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली.
 

06:02 June 10

मुंबई-  मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणी परिसरात दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. इमारतीचा भाग कोसळल्याची ही घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि मुंबई पोलिसांकडून बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत १७ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

मालाड मालवणी भागातील न्यू कलेक्टर कम्पाऊंड परिसरात एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारील दोन मजली घरांवर पडला. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक सुद्धा घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. मोठ्या वेगाने घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पाऊस सुरू असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारासमालाड, मालवणी, अब्दुल हमीद रोड, मालवणी गेट नंबर ८, न्यू कलेक्टर कंपाउंड, प्लॉट नंबर ७२ या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीतील एक दुमजली घर शेजारील घरावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बाजूच्या घरावर कोसळले. इमारतीचा हा भाग थेट शेजारील दोन मजली घरांवर कोसळला.
ही इमारत अधिकृत होती की अनधिकृत आहे या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पावसाळा सुरू होताच मुंबईत इमारत दुर्घटना घडण्याचं सत्र सुरू होते. दरवर्षी अनेक इमारतींचा भाग कोसळून किंवा इमारत कोसळून मोठ-मोठ्या दुर्घटना घडत असतात. आज मुंबईत पहिला पाऊस होताच मालाडमध्ये दुर्घटना घडली आहे.
 

Last Updated : Jun 11, 2021, 12:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details