मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर जुंपलेली असताना आता माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Nilesh Rane has tweeted On CM ) मुख्यमंत्री चालवत असलेल्या गाडीचे प्रदूषण प्रमाणपत्र व विमा पॉलिसी संपल्याची बाब त्यांनी ट्विट करून सांगितली आहे. तसेच, असे मुख्यमंत्री राज्य कसे चालवत असतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे ट्विट मध्ये
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कालबाह्य प्रदूषण प्रमाणपत्र आणि कालबाह्य विमा पॉलिसी असलेल्या कारमध्ये फिरतात. जर तोच माणूस राज्य चालवत असेल तर येथे गोष्टी कशा हाताळल्या जातात याची कल्पना करू शकता.
याचे पडसाद विधानसभेत उमटणार
मागच्या अधिवेशनामध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची थट्टा उडवल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. तसेच, या प्रश्नावर सभागृहात गदारोळ सुद्धा माजला होता. आता पुन्हा एकदा अधिवेशन सुरू असताना माजी खासदार निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे कालबाह्य प्रदूषण प्रमाणपत्र आणि कालबाह्य विमा पॉलिसी याचा हवाला देत पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फोडलं आहे.
पडसाद विधानसभेमध्ये उमटण्याची शक्यता
तसेच यावेमध्ये कालबाह्य कागदपत्र झालेल्या गाडीच स्टेरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, ते मुख्यमंत्री राज्य कसे चालवतील, त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? असा टोमणाही निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लागल्याने, आता या प्रकरणी याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -सोनिया गांधी कडाडल्या, मागितला उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरच्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा