महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हाथरस घटना : आरोपींना महिन्याच्या आत फासावर लटकवा - नीलम गोऱ्हे - नीलम गोऱ्हे हाथरस घटना

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

nilam  Gorhe's
नीलम गोऱ्हे

By

Published : Sep 30, 2020, 3:59 PM IST

Updated : Sep 30, 2020, 4:26 PM IST

मुंबई -उत्तर प्रदेशमध्ये सरकार फिल्मसिटी काढायला निघाले आहे, ज्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा लागू करणे आणि संबंधित मुलींना संरक्षण देणे त्याचबरोबर बलात्कारातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे हे अतिशय गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेश सरकारचा बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन, या विषयाकडे लक्ष वेधणारे पत्र राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे दिलेले आहे. त्यासोबत गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हाथरसच्या घटनेमधून परत एकदा महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उतर प्रदेशातील भीषण वास्तव समोर आले आहे.

नीलम गोऱ्हे हाथरस घटनेवर प्रतिक्रिया देताना

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सरकारमधील जे लोक या घटनेला जबाबदार आहेत, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे व त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

काय आहे प्रकरण -

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. नंतर अत्यंत गंभीर अवस्थेत ती आढळली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. तिला जबर मारहाण करण्यात आली होती. पीडित मुलीला दुसर्‍या दिवशी अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Last Updated : Sep 30, 2020, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details